Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पाळीव कुत्र्याला जाळून मारले, पिंपळे गुरवमधील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Indian_Pariah_Dog-552x330-1.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
इंडियन परिहार नर जातीच्या पाच वर्षाच्या पाळीव कुत्र्याला जाळून मारल्याची -हदयदृावक घटना पिंपळे गुरवमध्ये रविवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
विनोद राजन मुरार (वय 50, रा. समर्थ निवास, शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद यांचा पाच वर्षाचा इंडियन परिहार नर जातीच्या कुत्र्याला शनिवारी सायंकाळी विषारी अन्नपदार्थ देण्यात आले.
रविवारी (दि. 3) सकाळी सात वाजता येथील पवना नदीच्या किना-यावर काळ्या रंगाचा कुत्रा पांढ-या पोत्यात अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मिळून आला. याप्रकरणी सांगवी पोलिसांत तक्रार देण्यात आली. सांगवी पोलीस याचा तपास करीत आहेत.