न्यू सिटी प्राईड स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची किलबिल
पिंपरी | प्रतिनिधी
कोरोनामुळे लॉकडाउन झाले आणि मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून सर्व शाळा बंद ठेवाव्या लागल्या. वर्ष संपले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले. तरीही शाळा बंदच होत्या. ऑनलाइन वर्ग सुरु झाले. कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता नववी ते १२ वीचे वर्ग स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार न्यू सिटी प्राईड स्कूल मध्ये शाळा सुरु करण्यासाठी सॅनिटाईजर,मास्क व आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सरकारच्या नियमानुसार सर्व खबरदारी व उपाययोजनाची पुर्तता केली. सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की, प्रत्येक विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शरीराचे तापमान मशीन द्वारे करण्यात आले. तसेच सर्व वर्ग खोल्या, ऑफिस व परिसराची निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून वर्गात २० ते २५ विद्यार्थी बसविण्यात आले. घरात ७ ते ८ महिन्यापासून बसून असल्यामुळे मुलांची उत्सुकता वाढली असल्याचे चित्र होते. ऑनलाईन शिक्षण घेताना आलेल्या अडचणीवर शाळेत आल्यानंतर मात करता येणार आहे. चांगले दर्जेचे शिक्षण विध्यार्थ्यांना मिळणार आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना कोणतीही खंत बाळगू नये, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले. शाळांनाही मुलांची काळजी आहे” असे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पलता डीक्रूझ यांनी सांगितले. सर्व मुलांचे गुलाबाचे फुल देऊन सकाळी स्वागत करण्यात आले. सर्व मुलांना, शिक्षकांना ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सॅनिटाईजर व मास्क संस्थेतर्फे देण्यात आले.