काय झालं 6 आमदार गेले तर, एक आमदार अजूनही ठाम, नितीश कुमारांचा भाजपाला सूचक इशारा
![Nitish Kumar angry over JDU candidates joins BJP in AP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/bihar_chief_minister_nitish_kumar_jpg_1576769117.jpg)
बिहारच्या राजकारणात एक वेगळेच वारे वाहू लागले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीएचा घटक पक्ष भाजपावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. अरुणाचल प्रदेशात जनता दल युनायटेड (जेडीयू) च्या 6 आमदारांना भाजपाने गळाला लावल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाले आहेत. रविवारी पाटणामध्ये आयोजित जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान त्यांनी मोठे वक्तव्य केली.
नितीश कुमार म्हणाले की, मला मुख्यमंत्री पदावर राहण्याची कोणतीही इच्छा नाही. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, नितीश कुमार यांनी म्हटले की, एनडीएने कुणालाही मुख्यमंत्री बनवावे, मला यामुळे काहीही फरक पडत नाही आणि मला कोणत्याही पदाचा मोह नाही.
नितीश यांनी पुढे म्हटले, माझी मुख्यमंत्री राहण्याची अजिबात इच्छा नाही. माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, तेव्हा मी मुख्यमंत्री पद ग्रहण केले होते. कुणीही सीएम बनावे, कुणाचाही मुख्यमंत्री बनवा, मला कसाल्याही प्रकारचा फरक पडत नाही. काय झालं 6 आमदार गेले तर, एक आमदार अजूनही ठाम आहे, असेही नितीश कुमार म्हणाले.