स्कॉटलंडहून आलेला नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त
नाशिक – परदेशात आढळलेल्या नव्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच स्कॉटलंडहून आलेला नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त आढळला आहे. या तरुणाला नव्या कोरोना विषाणूची लागण तर झाली नाही ना, अशी भीती वर्तविली जात आहे.
१३ डिसेंबरला हा तरूण स्कॉटलंडहून भारतात आला होता. ८ दिवस होम क्वारंटाईन झाल्यानंतर २४ डिसेंबरला त्याची आई कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर २६ डिसेंबरला त्याचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता नव्या विषाणूच्या तपासणीसाठी त्याचे स्वॅब रवाना करण्यात आले आहेत. दोन दिवसांत या तपासणीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. तसेच या तरूणाच्या संपर्कात आलेल्यांचीदेखील कोरोना तपासणी होणार आहे. कुटुंबात परदेश दौऱ्याची माहिती असल्यामुळे या दोघांना नवीन विषाणूची लागण झाल्याची भीती वर्तविली जात आहे.
दरम्यान, परदेशातून आलेल्या नागरिकांकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे परदेशातून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घालण्यात आली आहे. ही विमान सेवा आता बंद आहे.





