breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन
![Organizing a lecture on the occasion of Atal Bihari Vajpayee's birthday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/atalji1_201808120380.jpg)
‘श्री अमोल थोरात सोशल फाऊंडेशन पिंपरी-चिंचवड’ च्या वतीने आयोजन
पिंपरी | प्रतिनिधी
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्री अमोल थोरात सोशल फाऊंडेशन पिंपरी-चिंचवड’ च्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ’राष्ट्र का स्वाभिमान’ श्रीराम मंदिर निर्माण या विषयावर राष्ट्रीय किर्तनकार हभप चारूदत्त आफळे हे व्याख्यान देणार आहेत.
चिंचवडगाव येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी 5 वाजता हे व्याख्यान होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे, आवाहन आयोजकांनी केले आहे.