Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडी
“राज्य सरकार दलित,आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधात”; गोपीचंद पडळकर
![Mahavikas Aghadi against Dalit, Adivasi, Gopichand Padalkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Mahavikas-Aghadi-against-Dalit-Adivasi-Gopichand-Padalkar.jpg)
मुंबई – काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे
सोनिया गांधी यांनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली असं म्हणत पडळकरांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं असून व्हिडीओ पोस्ट केला आहे.
“हे महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील आहे, हेच मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. मात्र आता मा.सोनिया गांधींनीच पत्र लिहून महाविकास आघाडी सरकाराच्या नाकर्तेपणाची पोचपावती दिली आहे. आतातरी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेसाठी लाचारी नाकारून आपल्या समाज बांधवांसाठी न्याय मिळवून द्यावा” असं पडळकरांनी म्हटलं आहे.