Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
राजस्थानमध्ये भूकंप; दिल्ली-एनसीआर हादरले
![Mild tremors felt in western Maharashtra at 9.16 am!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/bhukamp.jpg)
नवी दिल्ली – राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा भूकंप झाला असून दिल्ली-एनसीआरपर्यंत त्याचे हादरे जाणवले आहेत. रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी झालेल्या या मध्यम स्वरुपाच्या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. अलवार हे भूकंपाचे मुख्य केंद्र होते अशी माहिती राष्ट्रीय भूकंप केंद्राकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर लोक घाबरून आपल्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर भूकंपाबाबत अनेकांनी ट्विट केले. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाजियाबाद या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे युजर्सनी म्हटले आहे.