Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी गणेश जवळकर
![Ganesh Jawalkar as District General Secretary of Bharatiya Janata Yuva Morcha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/गणेश.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी गणेश जवळकर यांची निवड करण्यात आली. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप व युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे यांनी ही निवड केली. या वेळी जवळकर यांना निवडीचे पत्र दिले. या वेळी गणेश जवळकर म्हणाले की, आज पर्यंत केलेल्या सामाजिक कामांची दखल पक्षाने घेतली. आपल्यावर जबाबदारी सोपवली आहे. पक्ष हितासाठी काम करत युवकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार आहे. कामाद्वारे केलेली निवड सार्थ ठरवणार असल्याचे प्रतिपादन जवळकर यांनी केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/WhatsApp-Image-2020-12-14-at-4.53.20-PM-2-1024x752.jpeg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/WhatsApp-Image-2020-12-14-at-4.53.20-PM-1024x768.jpeg)