Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

महापालिकेचे २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत; महापौर माई ढोरे यांच्याकडून कौतुक

पिंपरी । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील २१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या विद्यार्थ्यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

महापालिकेच्या शाळेत शिकून हे घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा पुस्तक, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन महापौर ढोरे यांनी सत्कार केला.

यावेळी उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक माऊली थोरात, संदिप वाघेरे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे, शिक्षण अधिकारी पराग मुंढे, पर्यवेक्षक रविंद्र शिंदे, सुनिल लांघी, रजीया खान, अनिता जोशी, राजेंद्र कांगोडे, राम लिंबे, विलास पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button