लंडनमध्ये सैफ-करिनाची मौजमस्ती
बॉलीवूडची बेबो करिना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान सध्या लंडनमध्ये सुटीचा आनंद घेत मौजमस्ती करत आहेत. तसेच करिना-सैफ एका जाहिरातीचे शुटिंगही करत आहेत. या दोघांनी बऱ्याच वर्षांपासून एकत्रित काम केलेले नाही. मात्र, आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सोशल मीडियावर या जाहीरातीचे काही सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये सैफ-करिनाची जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे. सैफिना या फोटोंमध्ये एका ड्रिम कपलसारखे दिसत आहेत.
दरम्यान, करिना कपूरचा नुकताच “वीरे दी वेडिंग’ चित्रपट प्रदर्शीत झाला असून त्याने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमविला आहे. चित्रपटातील करिनाच्या भूमिकेचीही प्रेक्षकांकडून स्तुती होत आहे. तैमूरला जन्म दिल्यानंतर करिनाचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटातून करिनाने हे सिद्ध करून दाखविले आहे की, आजही प्रेक्षक तिच्या अभिनयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावरून करिना पुढील काळातही चित्रपटात काम करणार असल्याचे दिसून येते. तसेच करिनाने अद्याप आपल्या आगामी चित्रपटाबाबत काहीही सांगितले नाही. मात्र, ती करण जोहरच्या चित्रपटात बॉलीवूडचा किंग अर्थात शाहरूख खान सोबत झळकण्याची शक्यता आहे.