Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
विजेच्या धक्क्याने ठाण्यात दोन वानरांचा मृत्यू
![Two monkeys die in Thane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Monkey-shock.jpeg)
ठाणे – ठाण्यात दोन जंगली वानरांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राम नगर, वागळे इस्टेट, रिस्पेर सिलिंग कंपनीजवळ, रोड नंबर २८ येथे आज सकाळी ८:३२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाचा :-राज्यात थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ
मिळालेल्या माहितीनुसार, दोन जंगली वानर इलेक्ट्रिक पोलवर चढलेले असताना त्यांना शॉक लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत काही अज्ञात मुलांनी मृत वानरांना राम नगर येथील डोंगरातील जमिनीत दफन केले होते. स्थानिक नागरिकांनी याबाबत आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती दिली.