लस टोचल्यावरही कोरोना होणार नाही याची खात्री नाही, फायझर कंपनीने संभ्रम वाढवला
नवी दिल्ली – कोरोनाच्या माहामारीत होरपळलेल्या संपूर्ण जगाला लसीचे वेध लागले आहेत. त्यातच भारतातही फायझर कंपनीने लस विक्री आणि वितरणाची परवानगी मागितल्याने भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र, फायझरने केलेल्या एका वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
वाचा:-भारतात लस विक्री व वितरणाची परवानगी द्या, फायझरची DCGI कडे मागणी
ब्रिटनकडून लसीकरणाची तयारी सुरू असतानाच फायझर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. एनबीसीच्या लेस्टर हॉल्ट यांना दिलेल्या मुलाखतीत फायझरचे सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी ही माहिती दिली. लसीकरणानंतरही एखाद्या व्यक्तीद्वारे कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना बोर्ला म्हणाले, हे खात्रीने सांगू शकत नाही. मला वाटतं, याचं परीक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला जे माहिती आहे, त्याआधारावर संक्रमणाविषयी काहीही खात्रीने सांगू शकत नाही,” असं बोर्ला म्हणाले.