Drug Case मध्ये बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याची होणार चौकशी, NCB ने पाठवला समन्स
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये बॉलिवूडमधील बडी नावं समोर येत आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो कडून याप्रकरण कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी एक महत्त्वाचे अपडटे हाती येत आहे, या ड्रग प्रकरणात आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल याची देखील चौकशी होणार आहे. एनसीबीनी अर्जुनला समन धाडलेला आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याला उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आलेला आहे.
काही दिवसांपूर्वी एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्स हिची देखील चौकशी केलेली आहे. दरम्यान आता अर्जुनला देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार Gabriella आज देखील एनसीबीसमोर हजर झाली होती. बुधवारी गॅब्रिएलाची एकूण 6 तास चौकशी झाली. याच चौकशीचा भाग म्हणून तिची आज देखील चौकशी करण्यात आली.