Breaking-newsराष्ट्रिय
MVSSL या जहाजाला आग, 11 जणांना वाचवण्यात यश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/mv_ssl-56.jpg)
नवी दिल्ली – कोलकाताला जाणाऱ्या MVSSL या जहाजाला आग लागल्याचे वृत्त आहे. हे जहाज कृष्णपटनम येथून कोलकाताला जात असताना ही घटना घडली. कंटेनरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली आहे. जहाजावर एकूण 22 क्रू मेम्बर होते. यापैकी 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे तर इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जहाजावर आग लागल्याची माहिती मिळताच बचावासाठी हलदियातून मदत पाठवण्यात आली आहे. मात्र, खराब हवामान आणि जोराचे वाऱ्यामुळे आग अजूनच वाढत असल्याचे सुत्रांनी सांगितले.