breaking-newsराष्ट्रिय
काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
बांदिपोरा – जम्मू काश्मीरमधील बांदिपोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या घटनेत 1 जवान शहीद झाला आहे. जवानांनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या गोळीबारात लष्कराचा जवान गंभीर जखमी झाला होता. त्यांना त्वरित लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानने मंगळवारी रात्री केलेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले होते.