breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
तेलंगणामध्ये रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेच्या दोन कोचला भीषण आग
तेलंगणा: तेलंगणा येथे रेल्वेस्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेच्या दोन कोचला आग लागल्याची घटना घडलेली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मेधाचल रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेच्या दोन डब्यांना आज आग लागलेली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सीपीआरओ सी. आर. राकेश सांगतात, “स्टेशनवर उभ्या असलेल्या 10 डब्यांपैकी 2 डब्यांमध्ये आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही.”