Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील नऊ लाख लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकार शक्ती तयार

  • आय. जी. जी. एन्टीबॉडीज सर्व्हेक्षणातून झाले स्पष्ट
  • महापालिका आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिका व डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवडमध्ये सार्स कोविड – 2 आय. जी. जी. एन्टीबॉडीज सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमधील 8.5 लाख नागरिकांच्या शरिरात कोरोना विषाणुशी प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची दुसरी लाट जरी आली तरी पिंपरी-चिंचवडकरांवर ती प्रभावकारी ठरण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, कोविड तांत्रिक समिती सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. अमितव बॅनर्जी डॉ. भार्गव गायकवाड, डॉ.अतुल देसले उपस्थित होते.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ रोगाचा प्रार्दुभाव किती झाला आहे. हे पाहण्याकरिता तसेच किती लोकांमध्ये याबाबत रोग प्रतिकार शक्ती निर्माण झाली. यासाठी नागरिकांची सार्स-कोविड-२ आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज तपासणी मोहिम ७ ऑक्टोबर २०२० ते १७ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आली होती. मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी १० पथके तयार करण्यात आली होती. या पथकांकडून सर्वेक्षण १० दिवस करण्यात आले. त्यामध्ये पाच हजार नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले. मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी घेतलेल्या नमुन्यांची आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज तपासणीसाठी आय.सी.एम.आर व्दारे प्रमाणित अबॉट सीएमआयए टेस्टद्वारा करण्यात आली.

सर्वेक्षणात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह आय. जी. जी. ऍन्टीबॉडीज

नागरिकांमध्ये सर्वसाधारण३३.९%
झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये३७.८%
झोपडपट्टी सदृश भागातील नागरिकांमध्ये३८.३%
गृहनिर्माण सोसायटी भागातील नागरिकांमध्ये२७.७%
पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज महिलामध्ये दर३३.८%
पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज पुरुषांमध्ये दर२८.९%

महिलांमधील पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीजचा दर पुरुषांपेक्षा जास्त आहे. पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज वयानुसार ५१ ते ६५ वर्षाच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले. त्याचा दर ३५.५% इतका आहे. किशोरवयीन १२ ते १८ वर्षाच्या मुला-मुलींमध्ये ३४.९% इतका आहे. १९ ते ३० वयोगटामध्ये २९.७%, ३१ ते ५० वयोगटामध्ये ३१.२% व ६६ वर्षांवरील नागरिकांमध्ये २८.२% इतका आहे.

कोविड-१९ मुळे असणारा सर्वसामान्य मृत्यु दर ०.१८% इतका आहे. या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील ब-याच मोठया प्रमाणातील लोकसंख्येमध्ये पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज ‍दिसून आलेल्या आहेत. परंतु, भविष्यात दिवाळी सण व हिवाळा असल्याकारणामुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतरभान ठेवणे आणि हात वारंवार धुणे आदी कोरोना विषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button