Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
खासदार उदयनराजेंची आजची मराठा आरक्षणाची बैठक रद्द
![The state government should first clarify its role, then decide who will lead the movement - Udayan Raje Bhosale](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Udyanraje-Bhosale-1-300x200-1.jpg)
पुणे – भाजप खासदार उदयनराजे यांच्या नेतृत्त्वात आज (३० ऑक्टोबर) पुण्यात मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु, ही परिषद रद्द झाल्याची माहिती मिळत आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी या परिषदेचं आयोजन केलं होतं. मात्र, तब्येत बिघडल्यामुळे ही परिषद रद्द करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला याचिकाकर्ते, अभ्यासक, विधीतज्ज्ञांसह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार होते.
आज दुपारी दोन वाजता या परिषदेचं आयोजन पुण्यातील रेसिडेन्सी क्लबमध्ये करण्यात आलं होतं. या परिषदेसाठी खासदार उदयनराजेंसोबत मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरणारे वकील, याचिकाकर्ते, अभ्यासक उपस्थित राहणार होते. या परिषदेत मराठा आरक्षणाची पुढिल लढाई कोणत्या पद्धतीनं लढायची याची दिशा निश्चित करण्यात येणार होती.