राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा
मुंबई – लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उर्मिला मातोंडकर यांची नियुक्ती आता विधानपरिषदेवर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर त्यांना आमदारकी मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकीटावर मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चिन्हं आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या काँग्रेसच्या तिकिटावरून लोकसभा निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, अतितटीच्या स्पर्धेत त्यांचा पराभव झाला. मात्र, आता त्यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
उर्मिला यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.