Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’मध्ये पोस्ट कोविड ‘ओपीडी’, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती


पिंपरी / महाईन्यूज

कोरोना या गंभीर आजारातून बरे झालेल्या रूग्णांना नंतर देखील विविध प्रकारचे आजार उद्भवतात. विशेषतः मधुमेही, उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या रुग्णांना कोरानामुक्त ‌झाल्यानंतरही धोका कायम असतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रुग्णांसाठी ही ओपीडी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात सुरू केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांवर सुरुवातीपासून यशस्वीरित्या उपचार झाले आहेत. महापालिकेने सुरुवातीला वायसीएम रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले. पुढे रुग्णसंख्या वाढल्याने कोविड सेंटर, तसेच नेगरुनगर येथे मगर स्टेडीअमवर जम्बो रुग्णालय, चिंचवडमध्ये ऑटो क्लस्टर येथे कोविड आयसीयू रुग्णालय सुरू झाले. येथे आजअखेर तब्बल 83 हजार 374 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. मात्र, मागील महिनाभरापासून शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात आले. कोविड सेंटर बंद केले असून प्रमुख रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यामुळे वायसीएम रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी  येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची तयारी पालिका प्रशासनाची आहे.

त्याबरोबर सद्य:स्थितीत कोरोनामुक्त म्हणजे निर्धास्त, असे नाही. विशेषतः मधुमेही, उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या रुग्णांना कोरानामुक्त ‌झाल्यानंतरही धोका कायम असतो. त्यामुळे कोरोनामुक्त रूग्णांची नियमित आरोग्य तपासणी करण्याची मोठी गरज निर्माण झाली. ही गरज ओळखून महापलािकेने वायसीएम रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करून लवकरच पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली जाणार असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

महिनाभर हृदयविकार होण्याचा धोका

कोरोनामुक्त झाल्यानंतरही सुमारे एक महिनाभर हृदयविकार होण्याचा धोका रहातो. त्यातून हृदयाची क्रिया अचानक बंद पडून रुग्णाचा मृत्यू होण्याची काही अंश शक्यता असते. तसेच, काही रुग्णांमध्ये अर्धांगवायूचा झटका आल्याचे दिसले आहे. तसेच, खूप दिवस फुफ्फुसांचे आजार सुरू राहिल्यांचेही निदान झाले असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button