Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/images_1524999130703_Jayant_Patil.jpg)
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून केलेल्या भाषणातून महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!अशा शब्दात ट्वीटरवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील… कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील… अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही असे मत ट्वीट करत मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधानांच्या भाषणावर व्यक्त केले आहे.