आमदार कालिदास कोळंबकर यांच्या पुढाकाराने गरजु नागरिकांना अन्नदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/71832c81-56f6-42bc-bd2a-fe931f76e30a.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
जागतिक अन्नदान दिनाचे औचित्य साधून आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब गरजूंना अन्नदान चे वाटप करण्यात आले.
अन्न हे पूर्णब्रह्म..! खाण्यासाठी नक्की जगा..! पण पोट भरल्यावर ज्यांना जगण्यापूरतेही अन्न मिळत नाही त्यांच्यासाठी अन्नदान नक्की करा.., असा संदेश यावेळी देण्यात आला.
दि. १६ ऑक्टोबर जागतिक अन्नदान दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र.१९२ तर्फे, स्व. प्रमोद महाजन कला पार्क येथे जागतिक अन्नदान दिनाचे औचित्य साधून कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गार्डनचे सुरक्षा रक्षक तसेच गार्डन शेजारी असणाऱ्या गोर गरीब गरजूंना अन्नदान करण्यात आले. तसेच; निसर्गाचे देणे म्हणून गार्डन मधील तलावातील माश्यांना खाणे व पक्षांना दाणे देण्याचे भाग्य सुद्धाा लाभले.
या उपक्रमसाठी श्री. जितेंद्र विष्णू कांबळे, संतोष शिंदे, संदिप तिवरेकर, आदर्श दुबे, संतोष खेडेकर, निनाद कांबळे, हर्षल कांबळे यांचे अमूल्य सहकार्य लाभले.