‘छत्रपती’च्या वंशजांना अफजल खानाच्या औलादी म्हणणा-या विरोधात गुन्हा दाखल करा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201009-WA0007.jpg)
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पिंपरीत जोडो मारो आंदोलन
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांना अफजल खानाच्या औलादी, तसेच मराठा क्रांती मोर्चातील समन्वयांना दलाल संबोधून मराठा समाजाच्या भावना गुणरत्न सदावर्ते यांनी दुखवण्याचं काम केले आहे. या विरोधात पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आज (शुक्रवारी) जोडो मारो आंदोलन करण्यात आले. या बेताल वक्तव्य करुन समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
या आंदोलनात सतीश काळे, धनाजी येळकर, नकुल भोईर, जीवन बोराडे, गणेश सरकटे,सागर तापकीर, सुभाष साळुंखे, नकुल भोईर हे सहभागी होते.
याबाबत पिंपरी चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चा यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठा आरक्षण या मुद्द्यावर एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचे वारस असलेल्या खासदार संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि मराठा समाजाबद्ल प्रक्षोभक, चितावणीखोर, आक्षेपार्ह व दोन समाजात तेढ निर्माण करुन समाजाच्या भावना दुखवणारे, भडकवणारे विधान त्यांनी केले आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते यांचा उद्देश जातीय दंगली भडकावणे, अराजकता पसरवणे असा दिसत आहे.
दरम्यान, अॅड सदावर्ते यांनी बेताल वक्तव्य करुन समजामध्ये जातीय तेढ निर्माण करीत मराठा समाजाच्या भावना भडकावून राज्यात शांतता भंग होण्यास बेताल वक्तव्य करत आहेत. अशा बेजबाबदार प्रवृत्तीच्या माणसावर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केलेली आहे.