Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकडला टोळक्याचा हॉस्पिटलमध्ये राडा; कर्मचाऱ्यांना मारहाण करीत ईसीजी मशीनची तोडफोड

पिंपरी |महाईन्यूज|

बेशुद्धावस्थेत रुग्णालयात आणलेल्या व्यक्तीला मृत घोषित करताच टोळक्याने रुग्णालयात राडा घातला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करीत ईसीजी मशीनची तोडफोड केल्याची घटना वाकडमध्ये घडली.

करीम शेख, मुक्तार शेख व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापप्रकरणी नारायण सुरवसे (रा. पार्क स्ट्रीट , वाकड ) यांनी फिर्याद दिली आहे.

रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वाकडमधील काळेवाडी फाटा येथील एनआरएस रुग्णालयात आरोपींसह दहा ते पंधरा जण सलीम शेख यांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात घेऊन आले. मात्र, ते तपासणीपूर्वी मृत झाल्याचे समजताच त्यांचे नातेवाईक करीम शेख, मुक्तार शेख व त्यांच्या दोन साथीदारांनी मोठ्मोठाने आरडाओरडा, शिविगाळ करीत रुग्णालयात दहशतीचे वातावरण निर्माण केले. तेथील सुरक्षारक्षक, सिस्टर व मावशी यांना मारहाण करून ईसीजी मशीनची तोडफोड केली. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button