भोसरी मतदार संघात शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली अतिशय वेगाने सुरू झाल्या आहेत. भोसरी विधानसभेत मनसेने आपली ताकद दाखवायला सुरूवात केली आहे. भोसरी मतदार संघात आज सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश झाला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय ताकद वाढविण्यासाठी मनसेने जोरदारपणे सुरूवात केली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात मागील आठवड्यात शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश झाला. आता याचीच पुनरावृत्ती भोसरी विधानसभा मतदार संघात झाली आहे. च-होली गावात मनसेच्या कार्यालयासमोर सुमारे शंभर युवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा महापालिकेतील पक्षाचे गटनेते सचिन चिखले आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. यावरून आगामी महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभेतील राजकीय वातावरण मनसैनिक ढवळून सोडणार असल्याची ताकद स्पष्ट होत आहे.
रोहित गिरी, बालाजी पालकर, अमोल जाधव, जेम्स बनसोडे, राहुल गायकवाड, शिवम शिंदे, गणेश सावळे, विठ्ठल ढोणे, रोहित जाधव, गणेश बडे, श्रीकांत पोळ, संजय फटांगरे, सुनिल खंदारे, धनंजय सोळंकी, राकेश इंगळे, आकाश जाधव, अजय सावंत, कृष्णा पिंगळे, महादेव पिंगळे, तुषार चव्हाण, भारत क्षेत्रे, निलेश ननावरे, प्रतीक पाटील, प्रथमेश भेंडे, किरण बिन्नर, सावता राऊत, अनंता इंगळे, ऋषिकेश रोळे, एकनाथ डोंगरे, योगेश मोरे, महादेव ढेंबरे, योगेश चंदन, गौरव इंगळे, राजेश माटे, अथर्व डोंगरे, गोविंद परांडे, मंगेश जाधव, सचिन धोंडगे, तुकाराम सोमवंशी, सुनील राठोड आदी कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.