breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Rain.jpg)
औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रशांत बंब यांनी या पत्राद्वारे केली आहे. तसेच नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन बळीराजाला दिलासा द्यावा, असेही बंब यांनी पत्रात नमूद केले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/prashant-bamb-letter-to-cm.jpg)