Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यात राजकीय खलबते!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/FB_IMG_1601037654302.jpg)
पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक मुद्द्यांवर चर्चा
महाविकास आघाडीकडून महत्त्वाची जबाबदारी मिळणार?
पिंपरी | प्रतिनिधी
राज्याचे कामगार कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पिंपरी-चिंचवडचा राजकारणातील “हेवीवेट” नेते माजी आमदार विलास लांडे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी भेट दिली.
यावेळी पिंपरी- चिंचवडमधील स्थानिक मुद्द्यांवर चर्चा केली. आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी आमदार विलास लांडे यांना मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. त्यामुळेच लांडे यांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे खात्रीलायक वृत्त आहे.