अभिनेत्री निवेदीता सराफ यांना कोरोनाची लागण ;अग्गंबाई सासूबाई मालिकेचं शुटींग थांबवलं
मुंबई – माझी आई काळूबाई या मालिकेच्या सेटवरील २७ कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील आसावरी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री निवेदीता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोणतीच लक्षणं नसल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेेत. दरम्यान, या मालिकेचं शुटींग १६ सप्टेंबरपासूनच थांबवण्यात आलं होतं.
निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मालिकेतील इतर कलाकारांची चाचणी करण्यात आली. सुदैवाने सगळ्यांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. तसेच,तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक यांचेही अहवाल निगेटीव्ह आले आहेत. १५ सप्टेंबरपासून मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत शूटिंगला सुरुवात होईल. निवेदिता सराफ क्वारंटाइनमधून बाहेर आल्यानंतर शूटिंगसाठी उपस्थित राहतील. मालिकेच्या सेटवरील सर्वांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जात असल्याचं मालिकेच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं.