भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूची होणार फिटनेस टेस्ट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/indian-cricket-team.jpg)
नवी दिल्ली : अफगाणिस्तान विरोधात होणारा एकमेव कसोटी सामना आणि इंग्लंड विरोधात होणाऱ्या मालिकेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना यो-यो ही फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. यामध्ये या टेस्टमध्ये अपयशी ठरल्यास संघातून वगळले जाणार आहे.
माध्यमांच्या रिपोर्टनुसार, यो-यो मध्ये पास न झालेल्या खेळाडूला भारतीय संघातून डच्चू मिळणार आहे. अफगाणिस्तान विरोधात खेळाणाऱ्या संघाची यो-यो टेस्ट शनिवार-रविवार होणार आहे. तर आयरलँड आणि इंग्लंडविरोधात होणाऱ्या मालिकेसाठी 15 जून रोजी यो-यो टेस्ट होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघात खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आपली फिटनेस यो-यो टेस्टद्वारे सिद्ध करावे लागते.
खेळाचा वेग आणि खेळाचे प्रमाण दोन्ही सध्याच्या काळात वाढले आहेत. त्यामुळे फिटनेस हा सर्वात मोठा मुद्दा आहे ज्यावर तडजोड करणे भारतीय संघाला नक्कीच परवडणारे नाही. त्यासाठी यो यो फिटनेस टेस्ट या फुटबॉलमधील फिटनेस टेस्टचा वापर करणे ही एक चांगली गोष्ट आहे. नवीन संकल्पनांचा कायमच संघाने स्वीकार करायला हवी, जेणेकरून आपण कोणत्याही संघापेक्षा मागे राहणार नाही. भारतीय संघातील विराट कोहली, एमएस धोनी, रवींद्र जडेजा या खेळाडूंच्या देहबोलीतून ही गोष्ट कायमच दिसते.