Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

महाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार सीईटी परीक्षा आणि त्याच्या नव्या तारखा mahcet.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. 1दरम्यान राज्यात घोंघावणार्‍या कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता महाराष्ट्र सीईटी सेल कडून प्रोफेशनल कोर्स मधील उच्च शिक्षणासाठी नवं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. दरम्यान नव्या वेळापत्रकामध्ये MHT CET 2020 च्या परीक्षा 3 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. त्याची सेंटर्स राज्यभर वेगवेगळ्या भागात आहेत.

सीईटी सेल कडून यंदा प्रोफेशनल कोर्सच्या MHT CET exam देखील एप्रिल 2020 मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र मार्च 2020 पासून दिवसागणिक कोरोना व्हायरसचं संकट वाढत असल्याने त्या अनेकदा पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान त्या रद्द करण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी कोर्टात सुनावणी देखील झाली. मात्र आता अखेर ही परीक्षा होणार आहे.

दरम्यान सीईटी परीक्षा साठी यंदा कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. त्यामुळे आता परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. विद्यार्थ्यांना सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावरच हॉल तिकीट येत्या काही दिवसांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. ते डाऊनलोड करता येऊ शकते.

हॉल तिकीटावर एक्झाम सेंटर, पत्ता, रिपोर्टिंग टाईम, परीक्षेची वेळ अन्य तपशील असतील. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहचताना हॉल तिकीटाची मूळ प्रत, ओळखपत्र, सेंटरच्या नावामध्ये काही बदल असतील तर त्याचे दाखले घेऊन येणं बंधनकारक असेल. त्याशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश नसणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button