सेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर
युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांची माहिती
शहरातील युवक-युवतींचा चांगला प्रतिसाद
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरात सेवा सप्ताहनिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भाजपा युवा मोर्चातर्फे ठिकठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले, अशी माहिती युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी दिली.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “सेवा सप्ताह” ची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शहरातील विविध भागातील कोरोना योद्धांचे आभार मानून त्यांना भेटवस्तू, अन्नधान्य आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शहरात रक्त संकलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्तत्त सुरूवात केली व आठ ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले गेले होते, अशी माहिती संकेत चोंधे यांनी दिली आहे.
शहरातील युवक-युवतींचा चांगला प्रतिसाद
रक्तदान शिबिराला शहरातील युवकांनी व युवतींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. शहरातील रक्तदान शिबिराचे प्रामुख्याने शिरीष जेधे, ऋषिकेश भालेकर, उदय गायकवाड, ऋतिक चव्हाण, सचिन बंदी, मिहीर झा, हेमंत देवकुळे, सचिन घोरपडे या युवा पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आपापल्या प्रभागात आयोजन केले होते.