मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे भाजपाला धक्का; तर,काँग्रेसची बाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/78229622.jpg)
मुंबई महापालिकेत शिवसेनेविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय जनता पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे धक्का बसला आहे. शिवसेनेची युती तुटल्यानंतर व राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावर भाजपनं केलेला दावा मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. मात्र, राज्यात शिवसेनेसोबत सरकारन असल्यानं भाजपनं विरोधी पक्षात न बसण्याचं ठरवलं होतं. त्यामुळं ३० नगरसेवक संख्येसह सभागृहात तिसरा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. महापालिका कायद्यानुसार हे पद देण्यात आले.
भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असल्यानं याच पक्षाच्या नेता विरोधी पक्षनेते पदी असावा, असा मुद्दा याचिकेत मांडण्यात आला होता. विद्यमान विरोधी पक्षनेते रवी राजा व महापालिका प्रशासनाला या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले होते.