दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीच्या चकचकीत दुनियेमागील अनेक नकारात्मक गोष्टी समोर येत आहेत. आता अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अनुराग कश्यपने माझ्यासोबत जबरदस्ती केली असल्याचे सांगत पायल घोषने पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच याबाबत सांगणे माझ्यासाठी नुकसानकारक असून माझी सुरक्षाही धोक्यात असल्याचे सांगत, तिने मदतीची विनंती केली आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्वीट करून हे आरोप फेटाळून लावले आहे. पायलचे आरोप बिनबुडाचे असून थोडी तरी मर्यादा बाळगा, असे अनुराग कश्यपने अभिनेत्रीला सुनावले आहे.अभिनेत्री पायल घोषने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने ट्वीट करून खंडन केले आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर अनुरागने वेळोवेळी त्याचे मत मांडले आहे. तसेच कंगना राणावत आणि अनुराग कश्यप याच्यात ट्विटवरवर शीत युद्ध रंगल्याचेही पाहायला मिळाले होते.