breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचे आज अखेर निधन झाले. भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी ट्विटरवरून तारासिंग यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
मुलुंड विधानसभा मतदारसंघात तारासिंग हे बरेच वर्षे आमदार होते. अत्यंत लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. मात्र, गेल्या काही दिवासंपासून ते आजाराशी लढत होते. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.