Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
अमिताभ गुप्ता यांची पुणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/IPS-officer-Amitabh-Gupta-pune.jpg)
मुंबई – राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक म्हणून मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
२२ पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख यांची वर्णी लागली आहे. तर शिवदीप लांडे यांची दहशतवादविरोधी पथकात पोलीस उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे.