अॅपलचं iPad Air लॉन्च; पाच कलर व्हेरिएट्समध्ये उपलब्ध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/air-apple-lounch.jpg)
Apple ने आपल्या खास इव्हेंटमध्ये iPad Air लॉन्च केलं आहे. iPad Air 329 डॉलर बेसिक प्राइजमध्ये युर्जसमोर सादर करण्यात आला. परंतु, विद्यार्थ्यांसाठी 299 डॉलरमध्ये उपलब्ध होणार आहे. याची बुकिंग आजपासून सुरु झाली असून विक्रीसाठी शुक्रवारपासून उपलब्ध होणार आहे.
Apple नवा iPad Air ग्राहकांसाठी पाच कलर व्हेरिएट्समध्ये उपलब्ध असणार आहे.नवा 8th जनरेशन Apple iPad पेंसिल आणि रेटीना डिस्प्लेसोबत येणार आहे. यामध्ये A12 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. गेमिंग लवर्ससाठी यामध्ये उत्तम फिचर्स देण्यात आले आहेत.Apple iPad Air मध्ये USB-C, सिंगल 12MP रियर कॅमेरा , 7MP फ्रंट सेंसर, मॅजिक किबोर्डचा समावेश आहे.
त्याचसोबत Apple iPad Air मध्ये 10.9″ लिक्विड रेटिना डिस्प्ले, स्टीरियो ऑडियो, आधीपेक्षा 40 टक्के हाय स्पीड सीपीयू आणि 30 टक्के अधिक चांगले ग्राफिक्स देण्यात आले आहेत.