Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडाली; ५ जणांचा मृत्यू, १० जण बेपत्ता

कोटा – राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 10 जण अद्याप बेपत्ता असल्याचे कळते आहे. राजस्थानमध्ये कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली असताना ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील बुंदी येथील चंदा खुर्दमध्ये चंबळ नदीत बोट बुडाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्याला सुरुवात झाली. तर पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. परंतु अद्याप 10 जण बेपत्ता आहेत. या बोटीत 14 मोटरसायकलही होत्या. दरम्यान, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group