अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही: राष्ट्रवादी-काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
![The state government provided the best lawyer in the country to maintain the Maratha reservation - Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/sharad-pawar-1.jpg)
नवी दिल्ली: मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको, कोर्टात जे वकील दिले ते लहान नव्हते, अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. ते दिल्लीत बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढायचा निर्णय घेतला, तर मार्ग निघेल. मला त्याबाबत कायदेशीर बाजू माहिती नाही, जर त्याबाबतचा पर्याय निघालेला, तर मला वाटतं कोणीही रस्त्यावर उतरणार नाही, असं शरद पवार म्हणालेले आहेत.
मराठा आरक्षणप्रकरणात जे वकील दिले ते ख्यातनाम होते. कपिल सिब्बल किंवा महाधिवक्ते हे ज्युनिअर आहेत का? आम्हाला समाजाला न्याय द्यायचा आहे. मला कोर्टाकडून पुन्हा न्याय मिळेल असं वातावरण हवं, असं शरद पवार म्हणालेले आहेत. अन्य राज्यात आरक्षण दिले, तर मग महाराष्ट्राने अपेक्षा केली त्यात मला काही गैर वाटत नाही.विरोधक यात सरकारची कमतरता सांगतात, पण विरोधकांना राजकारण करायचं आहे. विरोधकांनी आंदोलन करुन काही होणार नाही. हा प्रश्न कोर्टातूनच सुटणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर मी काही बोलू शकत नाही. पण आम्ही पुन्हा एकदा कोर्टात जाणार, असं शरद पवार म्हणाले आहेत.