Breaking-newsताज्या घडामोडी
मी चाललो माझ्या मार्गाने… तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज नागपूरकरांचा निरोप घेतला. ‘काही गोष्टी करता आल्या. काही करायच्या होत्या. पण त्यातच बदली झाली. आता नियमानुसार माझ्या मार्गानं निघालो आहे. आपल्यातील ऋणानुबंध असेच कायम ठेवा,’ अशी अपेक्षा त्यांनी नागपूरकरांकडून व्यक्त केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ नागपूरकरांनी घराबाहेर पडत त्यांना निरोप दिला आहे.





