Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात २४ तासांत तब्बल ७५ हजार ८०९ नवे रुग्ण

नवी दिल्ली – भारतात शनिवार आणि रविवारी प्रत्येकी ९० हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सोमवारी या संख्येत काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळाले. मागील २४ तासांत देशात तब्बल ७५ हजार ८०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १ हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ४२ लाख ८० हजार ४२३ वर पोहोचली आहे. यापैकी ८ लाख ८३ हजार ६९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत देशात ३३ लाख २३ हजार ९५१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ७२ हजार ७७५ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

दरम्यान, भारताच्या तुलनेत गेल्या २४ तासांत अमेरिकेत २५ हजार ३२५ आणि ब्राझीलमध्ये १० हजार १८८ नवीन रुग्ण आढळून आले. तर एका दिवसात अमेरिकेत २८६ आणि ब्राझीलमध्ये ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त नवे रुग्ण समोर येत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button