Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सुप्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे निधन

प्रख्यात मराठी लेखिका मीना देशपांडे यांचे आज पहाटे अमेरिकेत निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीना देशपांडे या सुप्रसिद्ध मराठी लेखक, कवी आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या.
मीना देशपांडे यांची साहित्य संपदा पुढील प्रमाणे- आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, आचार्य अत्रे यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह), अत्रे यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८), पपा – एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह), मॅरिलीन मन्रो (अनुवादित कादंबरी), मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै), ये तारुण्या ये (कथासंग्रह), हुतात्मा (कादंबरी)





