Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
धक्कादायक! खाप पंचायतीने महिलेला गावासमोर विवस्त्र करण्याची सुनावली शिक्षा

सीकर: राजस्थानातील शेखावाटी भागात एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथील खाप पंचायतीने (Khap Panchayat) सर्व सीमा पार करीत एका महिलेवर आपल्याच कुटुंबातील एका तरुणासोबत अवैध संबंध असल्याचा (Illegal relation) आरोप लावलेला आहे. यावेळी पंचायतीने तिला दिलेली शिक्षा माणुसकीला काळीमा फासणारी आहे.
खास पंचायतीवर आरोप आहे की त्यांनी महिलेला निर्वस्त्र (Nude) करीत तिला सार्वजनिकरित्या शेकडो लोकांसमोर आंघोळ घातली. 21 ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेनंतर मंगळवारी सांसी समाजाने पोलीस अधीक्षकांना आरोपींविरोधाक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.





