टी.व्ही. ९ मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/e0aeba76-3496-43ce-a652-e0eba85cc014.jpg)
पुणे । प्रतिनिधी
टी.व्ही. ९ मराठी वृत्तवाहिनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायकर यांची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह अली होती. त्यानंतर ते विश्रांतीसाठी गावी गेले. पुन्हा थोडी तब्येत बिघडली. तेव्हा स्वॅब टेस्ट केली. ती पोझिटिव्ह आली. मग कोपरगावच्या हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले. तिथे ४० हजार रुपये ऍडव्हान्स भरायला सांगितले. तेव्हा तिथे ऍडमिट न होता पुण्यात जम्बो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले. याठिकाणी त्यांची प्रकृती खालावत गेली. खासगी हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नव्हता. अखेर काल संध्याकाळी मंगेशकर मध्ये बेड उपलब्ध झाली. तिकडे शिफ्ट करण्यासाठी कार्डियाक अम्ब्युलन्स हवी होती. ती पहाटेपर्यंत मिळू शकली नाही. जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.