पुढच्या वर्षी लवकर या..: ‘महाईन्यूज’च्या पर्यावरणपूरक गणरायाला भक्तिमय निरोप!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/IMG20200901133419-scaled.jpg)
पिंपरी| प्रतिनिधी
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘महाईन्यूज’ च्या पुणे विभागीय कार्यालयातील ‘श्रीं’ च्या मूर्तीचे अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.
यावर्षी गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ‘ टीम महाईन्यूज’ने घेतला. त्यानुसार तुरटीपासून बनविलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.
गणेशोत्सव काळात पिंपरी-चिंचवड शहरातील मान्यवरांना गणरायांची आरती करण्याचा मान दिला गेला. आज अनंत चतुर्थीला ‘महाईन्यूज’ चे संस्थापक संपादक श्री. अधिक दिवे- पाटील यांनी श्रींची आरती केली. त्यांनतर कृत्रिम विसर्जन हौदात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी ‘महाईन्यूज’ चे मुख्य संपादक अमोल शिंत्रे, कार्यकारी संपादक विकास शिंदे, डिजिटल हेड नागेश सोनूले, ग्राफिक डिझाइनर रमेश पाटील, व्हिडीओ एडिटर सूचित कुलट आदी उपस्थित होते.
“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या..” असा जयघोष करत यावेळी हे संकटमोचन गणरायाला महाराष्ट्रवरील या कोणाच्या संकटाविरुद्ध लढण्याची आम्हाला शक्ती द्या..! अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये लाडक्या बाप्पाला भक्तीपूर्ण निरोप…
दरवर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा उत्सवावर करोनाचे सावट असल्याने साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. गर्दी टाळण्यासाठी आगमन, विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. विसर्जनासाठी पालिकेने विभागांमध्ये कृत्रिम तलाव तयार केले आहेत. अधिकाधिक गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी, सोसायटीच्या आवारात करावे, असे आवाहन पालिकेने केले होते. या आवाहनाला दीड ते सात दिवसांच्या गणपतीत भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/IMG20200822174949-1024x776.jpg)
पुण्यातील गणपती विसर्जनाला अल्का चौकात भक्तांचा महापूर पहायला मिळतो. म्हणूनच या चौकात येणारे पाच ही मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद असतात. तर महापालिकेचा एक मंच मंडळाच्या स्वागतासाठी सज्ज असतो. परंतु, यंदा कोरोनामुळे अल्का चौकात गणेशभक्तांची गर्दी दिसणार नाही.