Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

बिग बझार आता रिलायन्सच्या मालकीचा…

मुंबई | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज समुहाने फ्युचर ग्रुपचा घाऊक आणि रिटेल व्यवसाय २४ हजार ७१३ कोटी रुपयांना खरेदी केला. फ्युचर ग्रुपच्या फ्युचर रिटेलआणि फ्युचर लाइफस्टाइल फॅशन या कंपन्या रिलायन्समध्ये विलीन झाल्यामुळे बिग बझार हा रिटेल ब्रँड आता रिलायन्सच्या मालकीचा झाला. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील करारामुळे रिटेल क्षेत्रातील मोठा व्यवसाय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या ताब्यात आला आहे.

रिलायन्सला फ्युचर ग्रुपसोबतच्या व्हेंचरमुळे एकाचवेळी ऑनलाइन आणि ऑफलाइन क्षेत्रात होलसेल आणि रिटेल व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होणार आहे. बिग बझार, एफबीबी, फूडहॉल, इझी डे, नीलगिरी, सेंट्रल आणि ब्रँड फॅक्टरी हे ब्रँड आता रिलायन्स रिटेल व्हेंचरचा भाग होणार आहेत. अॅमेझॉन कंपनीनेही फ्युचर ग्रुपमध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रिलायन्सचा स्वतःचा रिलायन्स रिटेल हा मोठा व्यवसाय आहे. यात रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स एलवायएफ, रिलायन्स ज्वेल्स, रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स फूटप्रिंट, रिलायन्स लिव्हिंग, रिलायन्स मार्केट, रिलायन्स मार्केट होलसेल, अजिओ, हॅमलेझ, जिओ मार्ट आणि कन्नन डिपार्टमेंटल स्टोअर एवढे मोठे ब्रँड सामावले आहेत. यातील काही ब्रँडचा व्यवसाय तेजीत आहे.

तर काही ब्रँड अद्याप अपेक्षित प्रगती करू शकलेले नाही. या समस्येवर मात करण्यासाठी रिलायन्स समूह रिटेल क्षेत्रातील एखादा मोठा समूह विकत घेऊन त्यातील अनुभवी व्यवस्थापकांच्या मदतीने स्वतःचा रिटेल व्यवसाय वाढवण्यास उत्सुक होता. कोरोना संकटानंतर निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी रिलायन्सने थेट फ्युचर ग्रुप खरेदी करण्याची योजना आखली. फ्युचर ग्रुपनेही भविष्यातील आव्हानांचा विचार करुन रिलायन्ससोबत हातमिळवणी केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button