पिंपरी-चिंचवडमध्ये ‘दार उघड उद्धवा दार उघड’ : मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाचे घंटानाद आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/BJP.jpg)
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
भोसरीतील मारुती मंदिरातून पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन सुरू
पिंपरी । प्रतिनिधी
‘पुन:श्च हरिओम’ असा नारा देणाऱ्या राज्य सरकारने अद्याप मंदिरं खुली केलेली नाहीत. परिणामी, राज्यातील भाविक भक्तांना आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी मुकावे लागत आहे. कोरोनासोबत जगावे लागेल, अशी जनजागृती करणाऱ्या सरकारने मंदिरं खुली करावीत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील धार्मिक स्थळ बंद केली होती. मात्र, ‘अनलॉक’मध्ये मंदिरं अद्याप खुली केली नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी भोसरीतील मारुती मंदिर येथे घंटानाद आंदोलन केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.