breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काल २६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. यानुसार ही परीक्षा १२ सप्टेंबरला होणार होती. त्यातही बदल करत २० सप्टेंबरला ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आणि त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.