Breaking-newsआंतरराष्ट्रीय
स्पेनच्या मंत्रिमंडळात 64.7 टक्के महिलांचा समावेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/women-em-5.jpg)
माद्रिद (स्पेन) – स्पेनच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ गुरुवारी पार पडला. पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाचे 17 जणांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळात 11 महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्पेन आणि आणि संपूर्ण युरोप खंडाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने मंत्रिमंडळात महिलांना स्थान देण्यात आले आहे. पुरुष मंत्र्यांची संख्या आहे 7.
मंत्रिमंडळातील महिला मंत्र्यांचे प्रमाण 64,7 टक्के आहे. महिला मंत्री अर्थ आणि संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी पार पाडणार आहेत. पेड्रो सांचेझ यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधानपदाची सूत्रे ग्रहण केली होती.
या पूर्वे सन 2015 मध्ये फिनलॅंडच्या मंत्रिमंडळात 62.5 टक्के महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता.