Breaking-news
सांगलीत आज 251 जणांना कोरोनाची लागण

सांगली – सांगलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज पुन्हा 251 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 8 हजार 694 इतकी झाली आहे.
सध्या 3 हजार 35 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर सुमारे 5 हजार 314 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारादरम्यान तब्बल 345 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. सांगलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, वाढती रुग्णसंख्या ही आता सांगलीकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.




