breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु
रायगड । प्रतिनिधी
जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे (Mahad Building Collapse). या इमारतीत जवळपास 200 ते 250 रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. महाड शहरातील काजळ पुरा परिसरात ही दुर्घटना घडली.
दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे 10 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या 5 मजली इमारतीत साधारण 50 फ्लॅट होते. यात 200 ते 250 लोक राहत होते. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. स्थानिकांनी 10-12 लोकांना बाहेर काढलं आहे.